"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ग्रामपंचायत बोकटे, येवला – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र

नाशिक-येवला  राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,बोकटे सुमारे २२२५ लोकवस्तीचं हे गाव कोळगंगा नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.

धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
बोकटे गावाची एक खासियत म्हणजे एकच ग्रामदैवताचं कालभैरवनाथ मंदिर. इथे दोनच मोठे समाज आदिवासी आणि मराठा, पण दोघेही गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.

उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव

गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,वाघाड कालव्य मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. कांदा, मका, सोयाबीन, भाजीपाला, वेलवर्गीय पिकं,  यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे.
       

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत बोकटे, येवला

औद्योगिकीकरण येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथं देवळात कालभैरवाची मूर्ती आहे, पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. बोकटे गावाचं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी    व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . कोळगंगा नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर मोती नाला गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,, नियमित ग्रामपंचायत कराचा भरणा करा....

लोकसंख्या आकडेवारी


446
2225
1141
1084

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo